ती परत येणार आहे.....
Hello.... hello ...... अरे दीपक भाऊ ...! आवाज ओळखतो काय गरिबांचा....का विसरला?
Hello..... बोल की सुम्या साल्यानो तुम्हाला विसरून कस चालेल...जिवंत राहायचं आहे आम्हाला.
बोल भाऊ कसा आहेस...झाल्या ना exam... लवकर आवरून ये ... भाऊ सगळे तुझीच वाट पाहत आहेत.सगळा प्लॅन करायचा आहे आपल्या trip चा.
अरे हो झाली ना ....आज काय last paper देऊन निघतोय इथून.
बरं लवकर ये तु आपल्याला मोठा प्लॅन करायचं आहे चांगला. ७,८ दिवस मोठी ट्रीप करायची आहे आपल्याला...
हो पण कुठे जायचं नक्की ?
कोंकण दर्शन ला जायचं आहे...म्हणजे पॉइंट अजून फिक्स नाही झाले तू ये मग करू फिक्स तुम्हाला चांगली माहिती आहे राव कोकणची.
कोकण हा शब्द ऐकल्या बरोबर दीपक च्या अंगावर काटा आला.
हा पण नेमके कोणते पॉइंट ठरवलाय तुम्ही....?
दादा तू ये इकडे पहिला मग ठरवू पण कुणकेश्वर मध्ये राजन च्या हॉटेल मधे राहू.
आता कुणकेश्वर हे नाव ऐकताच दिपकच्या अंगावर परत शहारे आले.
त्याने लगेचच सुमितला बोलला काय यार तुम्हाला दुसरा कोणता पॉइंट भेटला नाही का..? कुणकेश्वर सोडून दुसरीकडे कुठे पण वस्ती करू.
अरे राजन पण येणार आहे आपल्यासोबत सो.. त्यांनीच हे ठरवला आहे ...तू ये मग बघू ना.
चल लवकर पेपर देऊन ये...‘All the best’ आल्यानंतर बोलू चल बाय.
दीपक ने मोबाईल बाजूला ठेवला आणि शांत बसला ... कुणकेश्वर च आणि दीपक च खूप जुने संबंध होते त्यामुळं त्याला कुणकेश्वर च नाव ऐकताच अंगावर शहारे येत होते.
दिपक आपल्या पेपरला जायची तयारी करू लागला...
सकाळचे ९ वाजून गेले होते याचा पेपर ११ वाजता सुरू होणार होता.
शेवटी हा तयार होऊन पेपर देण्यासाठी कॉलेज वर गेला. पण रोजच्या सारखा त्याचा हसमुख चेहरा आता थोडा वेगळा दीर्घ विचारात बुडलेल्या एका व्यक्ती सारखा भासत होता. सुमित चा फोन आल्यापासून त्याच्यात हा फरक झाला होता कदाचित.
तो तसाच येऊन Exam hall मध्ये जाऊन आपल्या सीट नंबर वर जाऊन बसला. Supervisor sir येऊन सगळ्यांना पेपर देले आणि पेपर लिहिण्यात सगळे लागले...
दिपकच्या मात्र मनात काही वेगळेच विचार सुरू होते...थोड्या वेळा नंतर भानवर येत कसा बसा त्याने पेपर लिहिला आणि exam hall मधून बाहेर पडला तसं सरळ आपली रूम गाठली.... आणि घरी जाण्यासाठी स्वतची बॅग पॅक करू लागला ...
त्याला कधी एकदा घरी जाऊन मित्रांना भेटेन अस झाला होता...त्यामागे एक वेगळाच कारण होतं...त्याला कुणकेश्वर ला जायचं नव्हते त्यासाठी सगळ्यांना भेटून पॉइंट्स बद्दल बोलायचं होता. तो बॅग उचलून रूम बाहेर पडला आणि आपली बाईक घेऊन घरी येण्यासाठी निघाला.त्याने बाईक चालवतच सुमित ला कॉल केला.
Hello ....सुम्या कुठे आहेस रे.?
Hello...हा बोला ना शेठ !
आहे ना घरीच तुम्ही निघालाय का नाही अजून...?
हा निघालोय मी इथून तू राजनला आणि असिफ ला कॉल कर आणि आपल्या फार्महाऊस वर या सगळे ७ पर्यंत मी येतोय तिथेच.
हा ok शेठ ! आणखी काय करू बोला....?
चल मी बाईक वर आहे येऊन बोलू...ok bye.
हा bye व्यवस्थित ये पण तु.
लगेचच सुमित ने सगळ्यांना कॉल करून संध्याकाळी दिपकच्या फार्महाऊस वर येण्यासाठी सांगितले.
७ वाजले होते सगळे दिपक ची वाट पाहत होते..तेवढ्यात दिपकच्या बुलेट चा आवाज आला सगळे दिपकला भेटायला बाहेर आले खुश होते सगळे खूप दिवसांनी असं हे एकत्र जमले होते...
काय यार दिप्या किती लेट केलास सातारा काय जास्त लांब आहे का तुझ्यासाठी तरी येवढं वेळ कसा काय लागला....? राजन बोलला
अरे तसं नाही रे हल्ली बाईक थोडी स्लो चालवतोय .....बस ना आता ती स्टंट बाजी....जीवावर बेतायची ...
हा असिफ भाई का बोलत नाही गप्प का आहे हा..... ? दिपक बोलला
काही नाही रे तुझी वाट बघत बसलो आहे १ तास झाला ,तुम्ही महाशय येणार मग सगळा प्लॅन ठरणार... बोला आता कसा आहेस...झाले ना पेपर्स सगळे?
हो भावा झाले ना. बर ट्रीप च कसं काय प्लॅन सांगा ...आपण तिघच जायचं ना सूम्या?
अरे नाही राजन,असिफ,तू मी आणि विशाल?...सुमित ने सांगितले
काय विशाल का त्याला का सांगितलं तुम्ही...तो असेल तर मग मी cancle होतो.तुम्ही जा त्याला घेऊन.
अरे भावा काय झालंय तुम्हा दोघांना येवढे बेस्ट फ्रेंड्स होता तुम्ही दोघे पण असे का करत आहात. २ वर्ष झाली बघतोय सरळ बोलला पण नाही तुम्ही. दोघं काय झालंय नेमका सांगत पण नाही....राजन बोलला
काही नाही झाला पण तो तेवढा नको तो असेल तर मी येणार नाही....
अरे भावा तुमचं काय असेल तर विसरा ना आता. सगळे एकत्र किती दिवसांनी फिरायला जायचं ठरवलं आहे तुझ्यासाठी प्लॅन मागे ठेवला होता प्लीज अस काही बोलू नको...सुमित बोलला
प्लीज यार दिप्या प्लॅन नको ना cancle करू...तू नाहीस तर कसली ट्रीप ची मज्जा येईल...तू जान आहेस रे भावा आता तर नाही बोलू नको ....असिफ बोलला
विशाल म्हणजे दिपकचा मित्र, दिपक मुळे त्याची बाकीच्यान सोबत मैत्री झाली होती .दिपक चा बेस्ट फ्रेंड होता दोघांचं खूप जमायचं. पण गेली २ वर्ष झाली या दोघांनी एकमेकांसोबत बोलायचं बंद केला होता.या मागचे नेमके कारण या दोघांशिवाय कोणालाच माहित नव्हते.
सगळे येवढे रिक्वेस्ट करत होते म्हणून शेवटी दीपक तयार झाला...शेवटी त्याने सगळ्यांना हो बोलला...
अरे लागलीच त्या विशालला पण कॉल कर आणि बोलवून घे इकडे या दोघांचं इथंच मिटवून टाकू..राजन बोलला.
लगेचच सुमित ने विशालला कॉल केला आणि त्याला दीपक च्या फार्महाऊस येण्यासाठी सांगतीले.
थोड्या वेळात विशाल देखील आला दीपक ला पाहून थोडा गप्पच राहिला ..
अरे ये रे भावा तुला सांगितलं होतं ना आपण ट्रीपला चाललोय त्यासाठी बोलावले आहे .खूप दिवस झाले प्लॅन होता जायचं पण दीपक साहेबांमुळे राहिला होता आता करू प्लॅन आणि लवकरच निघू...राजन बोलला
हा करू ना मग प्लॅन पॉइंट ठरला आहे ना?
हो भावा कोकणात जायचं आहे या वेळी...खूप वर्ष झाली कोकण फिरला नाही तू आणि दीपक काय नेहमी जाताय...या वेळी सगळे जावू....!सुमित ने सांगितलं.
कोकण ऐकताच विशाल थोडा गप्पच झाला त्याचा चेहऱ्यावरचा रंगच उडाला ..पण तो काही बोलला नाही.
हा चालेल ना जावू ना...कधी निघायचं फिक्स करा तयारी करायला बरं होईल.... विशाल बोलला
हे काय २दिवसात येतेल्या रविवारी निघू ...परत एक आठवडा फिरून परत येऊ राहण्याची सोय काय राजन च्या हॉटेल मधे होईलच..
हा ठीक आहे तर मग रविवारी सकाळी मी गाडी घेऊन येतो लवकर निघू सगळे....राजन बोलला.
दीपक साहेब ठीक आहे ना.?
हा ठीक आहे. नो प्रोब्लेम..
बरं चला आता तयारीला लागा सगळे...असिफ ने सगळ्यां ना सांगितले आणि सगळे. आपापल्या घरी आले....
असेच २ दिवस गेले आणि रविवारचा दिवस उजाडला सगळे आपली आपली बॅग घेऊन तयार होऊन बसले होते...
राजन सगळ्यांना घेऊन शेवटी दीपकच्या घरी आला...सगळे किती आनंदी होते .
दिपक तयारच होता गेट वरच उभा होता यांची वाट पाहत...हे सगळे दिपक ला घेऊन निघाले ....आणि गाडीत मोठ्याने गाणी सुरू झालीत ...
सगळे अगदी हॅपी मूड मधे होते...थोड्या वेळात त्यांनी कोल्हापूर सोडून पुढे आले आंबा घाटाचा रस्ता धरला ...
घाटात यांची फोटोशूट सुरू झाला प्रत्येक पॉइंट वर हे सगळे फोटो कडू लागले,निसर्गाचे असे दृश्य सारखा सारखा पाहायला नाही ना भेटत ते पण आपल्या बेस्ट फ्रेंड सोबत असताना त्या साठी २ प्रोफेशनल कॅमेरा घेऊन आले होते.मस्त अशी यांची ट्रीप सुरू होती,शेवटी मित्रांची हीच तर खरी मज्जा असते ,खूप दिवसांनी असे हे एकत्र फिरायला निघाले होते. आंबा घाटाच्या घनदाट झाडीतून यांची गाडी थोड्या वेळात गणपतीपुळे गाठली दुपारचे १,२वाजले असतील,
सर्वांना खूप भूक लागली होती प्रथम सर्वांनी हॉटेल गाठले आणि पोट पूजा केली..
आणि समुद्रात भिजून नंतर देव दर्शन घेऊ असे ठरवले.
सगळा ठरल्या प्रमाणे झाले, पण सूर्यास्त झाला होता त्यामुळे आज इथेच थांबायचं असा निर्णय झाला .राजन ने लगेच त्याच्या एका फ्रेंड ला कॉल केला आणि हॉटेल मध्ये सर्वांना रहण्याची सोय केली.
दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे लवकर तयार झाले आणि पुढच्या प्रवासाला लागले .
यांचा दुसरा पॉइंट होता रत्नागिरी...
दिपक साठी हे सर्व काही नवीन नव्हते.
तो नेहमी या भागात फिरायला येत होता त्याच्या बाईक ने.
थोड्या वेळात यांची गाडी रत्नागिरी मधे येऊन पोहचली.
दिपक ने लगेचच सर्वांना घेऊन फिरवायला सर्वात केली...त्याला सर्व माहिती असल्यामुळे सगळे त्याच्या सोबतच फिरू लागले,यांना फिरता फिरता संध्याकाळ झाली तसे दिपक सर्वांना घेऊन एका हॉटेल मधे घेऊन आला ,हॉटेल मधे येताच हॉटेल मधील वॉचमेन ने दिपकला पाहून लगेच दिपक ला बोलवले .
खूप दिवसांनी आलात साहेब...?
हो काका खूप दिवसांनी आलो .....मित्रान सोबत आलो आहे !
हा मॅडमना घेऊन आला नाही का मग कश्या आहेत त्या.? ..वॉचमन काकांनी विचारले.
मॅडम????
सर्वाच्या चेहऱ्यावर एकदमच प्रश्र्नार्थी भाव आले?
दिपक ने लगेच प्रश्न टाळत विषय बदलला वॉचमेन काकांनी त्याची विचारपूस करू लागला.
थोड्या वेळात सर्वांनी हॉटेल मधे जेवण करून ते त्याच हॉटेल मधे रात्रीचा मुक्काम करायचा ठरवले.
सगळे एका रूम मधे गप्पा मारत बसले होते... तेवढ्यात राजने ने दिपक ला विचारले...? दिपक मगाशी ते वॉचमन काका मॅडम बद्दल विचारत होते काय भानगड रे?
राजनचा प्रश्न ऐकताच दिपक थोडा गोंधळाला
अरे ...अरे ...काही नाही मी नेहमी येतो ना या हॉटेल मधे त्यामुळे त्या काकांनी ओळख झाली होती,पण त्यांनी तसे का विचारले काय समजला नाही.
हम... हा... मग ठीक आहे आम्हाला काय वेगळाच वाटला ....सुमित बोलला...
विशाल तिथेच होता तो थोडा घाबरला होता पण त्याने कोणाला तस दाखवून दिला नाही....त्याला भीती होती की त्याला हा प्रश्न विचारला तर...म्हणून त्याने लगेच विषय बदलला....
त्याने लगेच उद्या कोणत्या पॉइंट ला जायचं असा असिफ ला विचारले ...?
अरे मला काय माहीत दिपकला च विचार ना..असिफ बोलला
उद्या आपण मालवण सिंधुदुर्ग ला जाऊ...खूप मस्त ठिकाण आहे मालवण आपण तिथेच २,३ दिवस राहू...दिपक बोलला...
हा चालेल पण सकाळी लवकर निघू इथून ... राजनने सांगितले
सकाळी ठरल्या प्रमाणे हे लवकर मालवण साठी निघाले काही तासात ते मालवण मधे पोहचले.....दिपक ने सर्वांना घेऊन सिंधुदुर्ग किल्ला फिरवला .... पूर्ण दिवस किल्ला पाहण्यातच गेला...शेवटी सगळे दमून मालवण मधे परत आले...दिपक ने त्यांना एका स्पेशल मालवणी हॉटेल मधे घेऊन गेला तिथे गेल्या नंतर दिपक त्याच्या मित्रांना त्या हॉटेलची खासियत सांगू लागला ....
मित्रांनो इथे सर्व प्रकारचे सी फूड खूप मस्त भेटते माझे फेवरेट हॉटेल आहे हे....
मग लवकर ऑर्डर दे भावा खूप भूक लागले किल्ला फिरून ...सुमित पोटावर हात फिरवत सांगितले.
हा....वेटर तर येऊदे रे..
तेवढ्यात एक वेटर येऊन दिपकला बोलवला ....अरे साहेब खूप दिवसांनी आलात... मॅडम कुठे दिसत नाहीत...?मित्रांसोबत आला आहात काय...?
अरे हो मित्रांसोबत आलोय चल लवकर ऑर्डर घेणा खूप भूक लागली आहे...दिपक ने वेटर च्या सुद्धा त्या प्रश्नावर टाळाटाळ करत होता...
राजनला,सुमितला असिफ ला काहीच समजेना अस झाल होतं ...
त्यांना एकच प्रश्न पडला होता सगळे याचे ओळखीचे याला मॅडम बद्दल विचारत आहेत आणि हा त्या प्रश्नाला टाळत आहे...
दिपक ने वेटर ला ऑर्डर दिली आणि वॉशरूम ला गेला ...पण बाकीच्यांच्या मनात एकच प्रश्न पडला होता ....शेवटी राजन बोलला मॅडम ची काय भानगड जिकडे जाईल तिकडे हाच प्रश्न दिपक ला विचारत आहेत...
अरे हो काल पण तिथे त्या काकांनी त्याला हा प्रश्न विचारला होता...असिफ बोलला..
अरे जाऊदे ना कशाला एवढा विचार करताय असेल काही तरी साहेबांचा सिक्रेट...तुम्ही नका जास्त विचार करू त्याचा सुमित बोलला...
येवढ्या सगळ्यात विशाल मात्र शांतच होता तो त्या ट्रीप मधे असून नसल्या सारखा होता...त्याला कोणती तरी गोष्ट मनातून खात होती...पण तो कोणासमोर बोलत नव्हता... खूप आतल्या गाठीचा होता....विशाल.
त्याच्या मनात काय चाललं असायचं कोणालाच काही समजत नव्हते.
सर्वांनी जेवण करून मालवण ची परत एकदा फेरी मारायची ठरवली...खूपच आवडला होता त्यांना मालवण...२ दिवस ते तिथेच मुक्काम केले....तिथून माडाची झाडे तिथला परिसर हा खरंच एखाद्याला मोहातपाडणारा असा होता...कोणाचेच तिथून पाय निघत नव्हते...शेवटी त्यांनी मालवण चा निरोप घेतला आणि त्याच्या पुढच्या पॉइंट कडे वाटचाल सुरू केली . पुढचा पॉइंट म्हणजे कुणकेश्वर होता...खूप सुंदर समुद्रकिनारा लाभलेला हे ठिकाण होता...हिरव्या गर्द झाडीत लपलेले हे ठिकाण खूपच मस्त होता ...
दुपारी निघालेली यांची गाडी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पर्यंत कुणकेश्वर जवळ येऊन पोहचली अजून थोडे अंतर होत...
राजन एकटाच ड्रायव्हिंग करत होता बाकी सगळे गाडीतच झोपले होते दिपक राजन च्या शेजारील सीट वर बसला होता गाडीच्या खिडकीच्या काचेतून बाहेर पाहत होता...,अचानक त्याला कसला तरी आवाज आला ..कोणी तरी त्याला हाक मारल्या सारखा .... दिपक गडबडून एकदम बाहेर मागे वळून पाहू लागला राजन ने त्याला विचारला काय झालं म्हणून तर त्याने काही नाही म्हणून सांगितले...; दिपक ला मनात थोडी भीती वाटल्या सारखा वाटला पण नंतर तो ठीक झाला ...;त्याच्या या सर्व हालचालीवर विशाल चे पूर्ण पणे लक्ष होते....;पण तो गप्पच होता...
थोड्या वेळात यांची गाडी कुणकेश्वर मधे पोहचली...
सगळे पटपट आपल्या बॅग्स घेऊन हॉटेल मधे गेले ...राजन चे स्वतःचे हॉटेल होते त्यामुळे सर्वांना स्पेशल रूम भेटल्या ...सगळे आपल्या आपल्या रूम मधे गेले आणि फ्रेश होऊन जेवण करण्यासाठी एकत्रीत आले...जेवण करून सगळे समुद्री किनारी फिरायला निघाले....,;त्या रात्रीच्या अंधारात तो समुद्री किनारा खूपच वेगळा वाटत होता ...बाकीच्या समुद्र किनाऱ्यापेक्ष्या हा सगळ्यात शांत होता....थोडा वेळ सगळे एकत्र शांत बसले आणि होते ....रात्रीचे १२वाजून गेले होते.... दिपकच्या अचानक परत तोच आवाज कानावर पडला...कोण तर त्याला बोलवत आहे त्याच नाव घेऊन अस त्याला वाटू लागला....बाकीच्यांना काहीच ऐकु येत नव्हते... दिपक उठला आणि काहीही ना बोलता तिथून उठला आणि आवाज कुठून येत आहे शोधु लागला ...तो सर्व पासून थोड्या दूर अंतरावर चालत गेला पण त्याला तो आवाज नेमका कुठून येत आहे हे समजत नव्हते....थोडा वेळ इकडे तिकडे पहिल्या नंतर तो परत येऊ लागला ...विशाल सोडला तर बाकी कोणाचे त्याच्याकडे लक्ष नव्हते....विशाल ने दिपकला येतेला पहिला ...पण त्याला लांबूनच त्याच्या मागे आणखी कोण तर येताना दिसला....विशाल त्याच्याकडे एकटक पाहू लागला त्याला काही स्पष्ट दिसत नव्हते पण दिपकच्याच मागुन कोण तर नक्की येत होता.... जस जस दिपक जवळ येऊ लागला तस तसे त्याचा मागील व्यक्ती अंधुक होऊ लागली आणि दिपक. पूर्ण जवळ आल्या नंतर ती नाहीशी झाली......विशाल पटकन उठला आणि दिपकच्या जवळ गेला आणि विचारला तुझ्यामागे कोणी तरी होते का आता ....?
तर दिपक ने नाही म्हणून सांगितले ...विशाल सांगितले की मी तुझ्या मागे कोणीतरी येताना पहिला ....तेव्हा सगळे विशाल वर हसू लागले सुमित बोलला अरे विशाल भाऊ कोणी नाही त्याच्या मागे आपणच आहोत आता या ठिकाणी...वेळ बघ किती झालंय येवढ्या रात्री कोण असणार आता
पण विशाल ला दिपक च्या मागे नक्की कोण तर येताना दिसला होता...
दिपक ने सांगितलं अरे सावली असेल रे माझी...
पण विशाल ने बोललला की अरे लांब केस होते अस दिसला मला कोणी तरी .....
त्यावर असिफ हसला आणि विशालला वेड्यात कडू लागला....;जाऊदे रे कोण तर असुदे आपल्याला काय त्याचे तुला तर काय पण दिसतं...
सगळे परत गप्पा मारत बसले...पण विशालचे मन कशात लागत नव्हते त्याचे लक्ष दिपकच्या मागे कोण तरी होता याच विचारात होता....शेवटी तो उठला आणि त्या दिशेने जाऊ लागला....कोणाचेच लक्ष त्याच्याकडे नव्हते...विशाल सगळ्यांनपासून. थोड्या अंतरावर आला तिथे बाजूला एक छोटा झुडूप होता त्याच्यामागे कसली तरी हालचाल त्याला जाणवली ....कसली हालचाल झाली पाहण्यासाठी विशाल थोडा पुढे झाला तर काही तरी झुडपात शिरताना त्याला दिसले...त्याने लगेचच आपल्या मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि शोधू लागला...पण त्याला तिथे काहीच दिसले नाही...तो माघारी येण्यासाठी तो परत फिरला थोडी पाऊले पुढे आला तेवढ्यात त्याला त्या झुडपामधून त्याचा नाव घेतलेला आवाज आला...कोणी तरी त्याला त्याच नाव घेऊन बोलवत आहे असा जाणवला....
तो आहे त्या जागीच थांबला खूप घाबरला होता...मागे वळून पाहिलं तर कोणी तरी त्या झुडपातून त्याला डोकावून पाहत होता.... विशालचे पूर्ण शरीर क्षणार्धात घामाने पूर्ण भिजले आणि तो भीतीने थरथर कापू लागला...तरी थोडी हिम्मत करून तो त्या झुडपाजवळ परत जाऊ लागला....तो त्या झुडपापर्यंत जाणार इतक्यात त्याच्या खांद्यावर एक हात पडला.... पडल्यावरवर मागे वळून पाहतो...तर त्याचे मागे राजन उभा होता....पण विशाल खूप घाबरलेला होता त्याचा चेरहा पूर्ण घामाने भिजलेला....
राजन ने त्याला विचारले अरे काय करतोय एकडे एकटाच आणि येवढं का घाबरला आहेस तू.... चेहरा बग तुझा घामाने केव्हढा भरला आहे...काही पाहिलास का तू ...?
विशाल ने काही नाही असाच आलेले काही नाही झाल... असे सांगतीले खर काय ते सांगितलं असतं तर सगळे परत हसतील म्हणून तो काही त्याला सांगितला नाही...पण विशाल ला खात्री झाली होती की तिथे काही तरी नक्की आहे....दोघे परत आले आणि सगळे निघू लागले....थोडा वेळ चालल्यानंतर सगळे हॉटेलच्या दारात येऊन पोहचले.... विशालच्या डोक्यात एकच विचार सुरू होता ....अजून पण तो खूप घाबरलेला होता...पण तो ही गोष्ट कोणाला सुद्धा बोलला नाही....सगळे आपल्या आपल्या रूम.मधे गेले विशाल मात्र सगळ्यांना पाठवून एकटाच हॉटेलच्या बाहेर उभा राहिला ....थोड्या वेळाने तो देखील त्याच्या रूम मधे गेला आणि झोपण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला तेच तेच दृष डोळ्यासमोर येत होते शेवटी तो उठला आणि हॉटेलच्या टेरेस वर जाऊन मोकळ्या हवेत उभा राहिला....त्या हॉटेलच्या टेरेस वरून समुद्री किनारा पूर्ण पने दिसत होता...त्याचे लक्ष त्या थोड्या वेळापूर्वी दिसलेल्या झुडपावर गेले.
तो त्या ठिकाणीच पाहत होता....पण त्याला काहीच समजत नव्हते....अचानक हवेतील गारवा वाढु लागला .....झाडून सळसळ असे आवाज येऊ लागले...पण विशाल अजून तिथेच पाहत होता....अचानक त्याच्या मागे कोण तर उभा असल्याचा त्याला भास झाला...त्याने गरकण त्याची मान मागे फिरवला...पण तिथं काहीच नव्हते...थोडा वेळ असेच गेले अचानक हॉटेलच्या गेट मधून धुराचा एक लोट आतमध्ये आला विशालचे लक्ष तिकडे गेले पण त्याला काही स्पष्ट दिसत नव्हते...तो हाताने आपले डोळे पुसू लागला जेणेकरून त्या धुराचा आतमध्ये काय आहे ते दिसावे म्हणून... परंतु त्याला काही दिसले नाही तो धुराचा लोट मधेच दिसेनासा झाला.....विशालला आता थोडी भीती वाटली होती काही तरी वेगळा होणार आहे याची जाणीव त्याला झाली... तसे तो खाली येण्यासाठी जिण्याचा दरवाजा उघडला आणि एक दोन पायरी खाली उतरला असेल इतक्यात टेरेस वरून कोण तरी धावत जातेल्या पावलांचा आवाज त्याच्या कानी पडला ...तो आवाज ऐकुन तो जागीच थांबला...आणि कान देऊन तो आवाज ऐकू लागला....काही क्षणात पावलांचे आवाज बंद झाला ...तेवढ्यात विशाल ला कोणी तरी बोलवतेला आवाज आला...त्याचा नाव घेऊन कोणी तरी एकदम लहान आवाजात त्याला बोलवत आहे असं त्याला ऐकु आला...
विशाल ला आता खूप भीती वाटत होती त्याचा संपूर्ण शरीर काही क्षणात घामाने लतपत झाला....
तो आता थोडी हिम्मत करत परत टेरेस वर जाऊ लागला....त्याने दरवाजा उघडला तसे त्याला कोणीतरी धावत गेलेला दिसला तो दरवाज्यातून थोडा बाहेर आला आणि इकडे तिकडे पाहू लागला ....त्याला टेरेसवर एका कोपऱ्यात टेरेस च्या रीलींग वरून कोणीतरी मुलगी चालताना त्याला दिसली तिचा चेहरा विशालच्या विरूद्ध दिशेला होता.... ती एकदम दबक्या सुरात एक गाणं गुणगुत होती.... ये रातें, ये मौसम, नदी का किनारा, ये चंचल हवा कहा दो दिलों ने, कि मिलकर कभी हम ना होंगे जुदा .....ते ऐकून विशाल खूपच घाबरला होता भीतीने त्याच गळा पूर्ण सुकून गेला होता .....त्याच्या तोडांतून आवाज फुटत नव्हता....तो फक्त तिकडे एकटक पाहत होता...त्याला आता समजले होते ती कोण आहे ...आणि खात्री देखील पटली....कारण हे तिचे आवडते साँग होता जे ती कायम दिपक सोबत असताना ऐकत होती... थोडी हिम्मत करत त्याने तिला विचारले ....कोण आहे तिथे?
विशालचा आवाज ऐकुन ती हसू लागली...एकदम कर्कश अश्या सुरात....तिने विशाल विचारले ओळखला नाहीस का मला ...?
विशाल ने मुद्दाम ओळखलं नाही असा दाखवत... नाही सांगितले...., आणि विशाल तिथून पळून जाऊ लागला आणि दरवाजा उघडू लागला....; टेरेसचा दरवाजा बंद झाला , विशाल दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करू लागला ....,पण काही फायदा नव्हता..
इतक्यात ती खूप जोरात हसू लागली आणि विशालला बोलली नाही उघडणार तो दरवाजा...;
ते ऐकून विशाल परत मागे फिरला तेव्हा त्याचे लक्ष परत त्या कोपऱ्यात थांबलेल्या त्या व्यक्तीकडे गेले....त्याच्या समोर एक मुलगी उभी होती मोकळे सोडलेले लांब केस ...आणि चेहरा पूर्ण पांढरा पडलेला...कपाळावर काहीतरी लगेलाला आणि त्यातून रक्त ओघळत होते...खूपच विचित्र असे रूप होते....ते दृश्य पाहून विशालला आश्चर्याचा धक्का बसला तो खूप घाबरला त्याच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला....तू ?
हो मीच आहे ... धक्का बसला का मला पाहून .....? किती दिवसां पासून या दिवसाची वाट पाहत होते शेवटी आला ना स्वतः हून...आज सोडणार नाही तुला मी.....;
ती पुढे काही बोलणार इतक्यात विशालला चक्कर आली आणि तो खाली कोसळला....;दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे उठून तयारी करू लागले पण विशाल मात्र अजून त्याच्या रूम मधून बाहेर आलेला कोणाला दिसला नाही , त्यामुळे सगळे त्याच्या रूम मधे जाऊन त्याला बोलवू लागले पण तो त्याचा रूम मधेच नव्हता...त्यामुळे सगळे त्याला शोधू लागले...खूप वेळ होऊन गेला होता...पण विशालचा पत्ता लागत नव्हता... सगळ्यांना विशालची काळजी लागली होती....
अरे कुठे गेला असेल हा...?किती उशीर झाला शोधतोय राजनने थोड्या गांभीर्याने विचारले...
असिफ ने सांगितले अरे गेला असेल कुठे तरी फिरायला एकटाच ....येईल थोड्या वेळात काळजी नका करू आता खूप वेळ झाला होता विशाल चा कुठेच पत्ता लागत नव्हता...सगळे काळजीत पडले होते दुपारचे १ वाजून गेले होते...रात्री पासून हा कोणालाच दिसला नव्हता....सगळे त्याला शोधून थकले होते...शेवटी ते हॉटेल शेजारच्या एका वडाच्या झाडाखाली बसले आणि हा कुठे गेला असेल याचा विचार करू लागले....तेवढ्यात सुमितच्या अंगावर झाडावरून पाण्याचे थेंब पडले तो पाणी कुठून पडत आहे पाहण्यासाठी वर पहिला तर त्याला धक्काच बसला ....विशाल त्या भल्यामोठ्या वडाच्या झाडाच्या वरती दोन फांदीच्या मध्ये झोपलेला दिसला ...त्याचे शरीर पाण्याने भिजले होते त्याचेच थेंब सुमित च्या अंगावर पडले...सगळ्यांनी मिळून पहिला विशालला खाली उतरवले तो बेशुद्ध अवस्थेत होता ....कोणालाच काही समजत नव्हते नेमके याच्या सोबत काय झाला आहे ते...राजन ने डॉक्टरांना बोलावलं डॉक्टर त्याला चेक करून गेले थोड्या वेळात शुध्दी वर येईल सांगून त्याला काही औषध देऊन निघुन गेले....संध्याकाळचे ५ वाजून गेले होते पण विशाल ला अजून शुद्ध आलेली नव्हती....सगळे त्याच्या रूम मधेच बसले होते...रात्री ९ वाजता त्याला शुद्ध आली तेव्हा सगळे त्याच्या बेड शेजारीच झोपी गेले होते त्याने सगळ्यांना आवाज दिला तेव्हा सगळे उठले ...तेव्हा सर्वांनी पहिला की विशाल खूप घाबरला आहे ....त्याला एसी रूम मधे सुद्धा घाम येत होता... त्यामुळं त्याला थोडा वेळ कोणीच काहीच विचारला नाही .... नंतर राजन ने विचारले काय झालं आहे तुला येवढं का घाबरला आहेस तू ...रात्री पासून कुठे होतास ?आणि तू त्या समोरच्या वडाच्या झाडावर कसं काय झोपलास....?
विशाल ने दिपक कडे पाहिलं आणि गप्पच राहिला ....त्याने सांगितले की कोणीतरी आहे या हॉटेल मध्ये आपण लवकर निघुया इथून अताच नीघु...चला ...
असिफ ने विचारले कोणीतरी म्हणजे...?
विशाल ने घाबरत सांगितले....प्रेत आत्मा आहे इथे...
हे ऐकुन सगळे शांत झाले कोणाला विशाल वर विश्वास बसत नव्हता .... सर्वांना वाटला विशाल आजारी आहे त्यामुळं काही तरी भलते सलते बडबडत आहे .... सुमित ने सांगितले की हो जाऊया आपण उद्या सकाळी निघू इथून ....आता येवढ्या रात्री नको निघायला....
दिपकला जाणवला की विशाल नेमका.काही तरी लपवत आहे आपल्या पासून ...पण तो शांत राहिला काही बोलला नाही .थोड्या वेळात सगळे जेवण करून आपल्या आपल्या रूम मधे झोपायला गेले....रात्रीचे १२,१वाजले असतील अचानक विशाल च्या रूम मधून ओरडण्याचा आवाज आला सगळे उठले आणि धावतच विशालच्या रूम मधे शिरले ....तेव्हा त्यांनी पहिला की विशालच्या तोंडावर कोणी तरी नखाने ओरबडले होते त्यातून रक्त येत होते तेव्हा सर्वांनी त्याला विचारले काय झालं का ओरडलास इतक्या जोरात आणि तुझ्या तोंडावर कोणी अस ओरबडले आहे....तेव्हा विशाल खूप घाबरला होता ...भीतीने थर थर कपात होता ..त्याने दिपक कडे पाहिलं आणि सांगितले की ती परत आले ..आणि ती मला नाही सोडणार ..मला मारून टाकेल प्लीज मला वाचवा....
कोणालाच काहीच समजत नव्हते ...
राजने ने विचारले ती म्हणजे कोण ...?तुला का मारणार आहे...?काय बडबडत आहेस सरळ सांग....
मृणाल परत आले आणि ती मला नाही सोडणार ती माझा जीव घेईल....;
मृणाल नाव ऐकताच दिपक स्तब्धच झाला त्याला ज्या गोष्टीची भीती होती तेच झालं...
राजनने विचारले अरे कोण मृणाल ? तुला का मारेल...कुठे आहे ती...?
तेव्हा विशाल काय बोलणार इतक्यात दिपक बोलला मृणाल आम्हा दोघांची फ्रेंड होती....
होती म्हणजे आता कुठे आहे मग ती सुमित ने विचारले...
ती २ वर्षा मागेच तीची डेथ झाले .... दिपक बोलला
एक मिनिट दिपक तू सगळा विस्तारित सांग मला काहीच समजत नाही मी या आधी कधी मृणाल च नाव तुम्हा दोघांच्या तोंडून ऐकला नाही....आणि आज अचानक या ठिकाणी काय भानगड....
तेव्हा दिपक सांगू लागला....२ वर्षामागे मृणाल नावाची माझी एक मैत्रीण होती...इथेच कुणकेश्वर मधे कॉलेज ला होती...सुरवातीला आम्ही दोघेच मित्र मैत्रीण होती नंतर विशाल सोबत तिची ओळख झाली ...आम्ही तिघे नेहमी भेटत .... होतो...थोडे दिवस असेच गेले ....माझा आणि मृणाल ची मैत्री खूप घट्ट झाली...माझी बेस्ट फ्रेंड झाली होती ती....त्या वेळी मला तिच्याबद्दल मनात प्रेमाचे भाव जागे होऊ लागले मला आवडायला लागली होती ती...तिच्या सोबत तासनतास फोन वर बोलत असत ...पण.कधी तिला दाखवून दिला नाही की मी तिच्या वर प्रेम करत आहे...भीती होती की तिला जेव्हा समजेल तेव्हा आमच्या दोघांमधील जे मैत्रीचे नाते आहे हे तुटेल...म्हणून मी तिला काही बोललो नाही....आम्ही दोघे खूप फिरायला जात होतो...म्हणून त्या दिवशी त्या वॉचमेन काका आणि तो वेटर मॅडम कुठे आहेत म्हणून विचारत होते त्या मॅडम म्हणजेच मृणाल....खूपच जवळ आलो होतो आम्ही पण कधी मनातील प्रेम व्यक्त नव्हते केले एकमेकांसमोर...
एक दिवस असाच न्यु इअर निमित्त भेटायचं ठरवलं होतं तेव्हाच मी तिला माझ्या मनातील सगळा सांगणार होतो आणि तिला प्रपोज करणार होतो ....त्यामुळे मी आणि विशाल कुणकेश्वर ला आलो होतो....तेव्हा ती आणि तिची एक फ्रेंड तिच्यासोबत आली होती....आम्ही ३१डिसेंबर च्या रात्री एका हॉटेल मध्ये जेवण केला आणि समुद्री किनाऱ्यावर बसलो होतो...१२ वाजायला अजून ४० मिनिट बाकी होते तेव्हा मृणाल बोलली की ती थोड्या वेळात परत येते तुम्ही सगळे इथेच बसा....आणि निघून गेली ...ती परत कधी आलीच नाही...तेव्हा थोड्या वेळात समजला की एका मुलीचे प्रेत समुद्री किनारी लाईट हाऊस च्या शेजारी पडले आहे ....ती मृणाल होती...माझ्या पाया खालची जमीनच सरकली....जिच्या सोबत अख्खा आयुष्य राहण्याचा स्वप्ने पाहत होतो तिचे निष्प्राण शरीर माझ्या समोर पडले होते....कोणालाच काही माहीत पडला नाही नेमका त्या दिवशी काय झालं पोलिसांना देखील काही पुरावे भेटले नाही... ती पाय घसरून लाईट हाऊस च्या बिल्डिंग वरून खाली पडली असेच समजून सगळे शांत बसले ...येवढं बोलून दिपक रडू लागला....
सगळ्यांचा लक्ष दिपक कडेच होते....विशाल कडे कोणाचाच लक्ष नव्हते .... इतक्यात जाणवलं की विशाल त्याच्या जागेवर नाही......हॉटेलच्या सर्व लाइट्स बंद पडल्या होत्या .....सगळे विशालला शोधत होते... तेवढ्यात हॉटेलच्या खालच्या बाजूने विशालच्या ओरडण्याचा आवाज आला....सगळे धावत त्या ठिकाणी पोहचले सगळे हॉटेलच्या हॉल मधे आले आणि पाहतात तर विशाल त्या हॉलच्या जुंबर वर लटकत होता त्याच्या डोक्यातून रक्त ओघळत होतं त्याचे थेंब थेंब जमिनीवर पडत होते....विशाल काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हता....सगळ्यांनाच ते दृश्य पाहून भीतीने घाम सुटला होता.... तेव्हा सगळ्यांनी मिळून विशाल ला खाली घेतले ..;
थोड्या वेळाने तो शुध्दीवर आला...त्याला सगळे विचारू लागले ..
काय झालं आणि तु जुंबर वर कसा काय गेला ...?
तेव्हा विशाल बोलला ! की मृणाल सोडणार नाही मला... ;ती मला मारून टाकेल प्लीज मला वाचवा ; मला इथून घेऊन चला म्हणून रडू लागला.... ;
ती तुला का मारेल ? तु तीच काही वाईट केला आहेस का?? मग ती तुला का त्रास देत आहे...? राजन बोलला .
मी काही केला नाही, मला माहित नाही काही ,पण ती मला मारून टाकेल मला इथून घेऊन चला ...असा बोलून विशाल रडू लागला....
विशाल काहीतरी नक्की आपल्यापासून लपवत आहे हे सर्वांना समजलं होता .....;
इतक्यात डोक्यातून रक्तस्त्राव होऊन विशाल परत एकदा बेशुद्ध झाला... ,
आणखी काही वेगळा घडायला नको म्हणून सगळे त्या हॉटेलच्या बाहेर पडले...; राजन ने पटकन त्याची गाडी बाहेर काडली आणि विशालला हॉस्पिटलला घेऊन गेले... ;
डॉक्टरांनी विशालला पट्टी केली आणि तिथेच ठेवून घेतले ...
विशाल खूपच अशक्त दिसत होता ....कोणालाच काही समजत नव्हते ;
मृणाल विशालला का मारणार आहे...विशाल पण काही बोलण्याच्या परिस्थितीत नव्हता....थोड्या वेळाने सगळे परत हॉटेल मध्ये आले आणि असिफ एकटाच विशाल जवळ हॉस्पिटलमध्ये राहिला ....;
सगळे खूपच चिंतेत होते. राजन आणि सुमितला विश्वास बसत नव्हता एखादी मृत व्यक्ती आत्मा होऊन परत येऊ शकते या गोष्टीवर ...;
दिवस भर खूप धावपळ झाल्यामुळे सुमित राजन आणि दिपक हॉटेलच्या हॉल मध्येच सोफ्यावर बसले होते राजन आणि सुमितचा तिथेच बसून डोळा लागला ...;
दिपक मात्र एकटाच विचार करत बसला ...., तेवढ्यात राजनच्या मोबाईलची रिंग वाजली आणि त्याची झोप मोड झाली...त्याने गडबडीने मोबाईल पहिला तर असिफ चा कॉल होता ...
Hello... राजन विशाल हॉस्पिटल मध्ये कुठे दिसत नाही तो तिकडे आला आहे का...?
राजन : काय? हॉस्पिटल मध्ये नाही म्हणजे कुठे गेला तो...? तू त्याच्या जवळ होतास ना असं कसं तो कुठे गेला... ?
असिफ: अरे मी ५ मिनिटसाठी वाशरूमला गेलो होतो पण मी परत आलो तेव्हा तो त्याच्या बेड वर नव्हता मी खूप शोधला पण कुठेच भेटत नाही ,तो म्हणून शेवटी मी तुम्हाला कॉल केला...तिकडे आला आहे का म्हणून.
राजन : अरे तो इकडे नाही आला...थांब आम्ही सगळे येतो तिकडे शोधु आपण सगळे ..
अरे काय झालं काय बोलत होता असिफ ..? सुमित बोलला
चला आपल्याला निघायला पाहिजे विशाल हॉस्पिटलमधून कुठे तरी गेला आहे...राजनने सांगितले
सगळे हॉस्पिटल मध्ये पोहचले तेव्हा असिफ ने त्यांना सांगितला ...तो तिथून कुठे तरी गेला आहे ते...
सर्वजण मिळून विशालला शोधु लागले हॉस्पिटल मधील वॉचमेन ला विचारले तर त्याने सांगितले की एकटा मुलगा त्या लाईट हाऊसच्या दिशेनं जाताना त्यांना दिसला आहे ...
दिपकच्या डोक्यात लगेच प्रकाश पडला तो लगेचच सगळ्यांना लाईट हाऊसच्या ठिकाणी घेऊ जाऊ लागला ...
काही वेळात ते लाईट हाऊस जवळ पोहचले , तेव्हा तिथे कसला तरी उग्र वास येऊ लागला ...त्यांना लांबूनच विशाल लाईट हाऊसच्या वरच्या दिशेने जाताना दिसला....
सगळे मिळून विशालच्या दिशेने धाव घेतली ....विशालला माहीत देखील नव्हते तो कुठे आला आहे ...;
तो बेशुद्ध अवस्थेत च होता, थोड्या वेळात त्याला जाग आली तेव्हा तो लाईट हाऊस च्या वरती जिथून मृणाल खाली पडली होती त्या ठिकाणी होता... ;
त्याच्या समोर मृणाल उभी होती .... लांब मोकळे केस ,चेहऱ्यावर भला मोठा घाव आणि त्यातून सुकलेले ओघळते रक्त चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य ... तिचा तो अवतार पाहून विशाल निःशब्द झाला , तोंडून शब्द निघत नव्हते ....
इतक्यात बाकी सगळे वरती आले आणि त्यांचे लक्ष विशाल समोर असलेल्या मृणाल वर गेले ....सगळे एकदमच शांत झाले ...मृणाल ला पाहून दिपक स्तब्धच झाला....
त्याचे डोळे पाणावले आणि तो एकटक पाहतच राहिला... चार वर्षा आधी किती सुंदर,नाजूक,एखाद्या परी सारखी दिसणारी मृणालचे आताचे हे रूप पाहून त्याला त्याचे अश्रू रोखता आले नाही ...
ती पण दिपक कडे एकटच पाहत होती ....तिच्या पण डोळ्यातून अश्रूंचा धारा वाहू लागल्या....
शेवटी दिपक ने तिला विचारलं ... का अचानक सोडून गेलीस मला...? माझा काही चुकलं होतं का...मृणाल...?का केलीस असा तू..?
दिपक मला तुला सोडून कुठेही जायचं नव्हते रे ....मला तुझ्या सोबत राहायचं होता आयुष्यभर....पण विशालकडे बोट दाखवत...या राक्षसामुळे मला तुला सोडून जावं लागलं.....
त्या न्यु इअर च्या रात्री मी तुला माझ्या मनातला सांगणार होते...; मी तुझ्यावर किती प्रेम करते हे तुला मी सांगणार होते....,म्हणून मी तुझ्यासोबत त्या रात्री फिरायला आले होते ....,मला ती रात्र खूप स्पेशल अविस्मरणीय बनवायची होती ; म्हणून मी तुझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणली होती ती रूम वरच विसरली.. , म्हणून मी ती घेण्यासाठी रूमवर आले तेव्हा... हा विशाल देखील माझ्या पाठोपाठ आला आणि त्याने मला सांगितले की आम्ही सगळे लाईट हाऊस वर आहे आणि तू तिथे ये...
मी देखील त्याच्या सांगण्यावरून लाईट हाऊस वर आले आणि तिथे फक्त विशाल एकटाच होता ..त्याने मला सांगितला होता सगळे इथेच आहेत पण तिथे कोणीच नव्हते.
तेव्हा त्याने मला रिंग दिली आणि मला प्रपोज केला ... , ध्यानीमनी पण नव्हते विशाल असे करेल ...; मि त्याला नकार दिला आणि त्याला सांगितला की मी दिपक वर प्रेम करते ...,आज मी त्याला माझ्या मनातील सांगणार आहे ...;
आपण मित्र आहोत आणि नेहमी चांगले मित्र राहू ..., तुला देखील माहीत आहे मी त्याच्यावर किती प्रेम करते ते तरी देखील तू असे कसे करू शकतोस ....?
माझा नकार ऐकून त्याने माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला ..,मी जिवाच्या आकांताने ओरडत होते ....; खूप विनवणी केली , हात जोडले पण त्याने एका लोखंडी गजाने माझ्या चेहऱ्यावर हल्ला केला आणि बोलू लागला... “तु माझी होऊ शकत नाहीस तर मी कोणालाही तुझी होऊ देणार नाही" म्हणून त्याने मला या कड्यावरून खाली ढकलून दिला...; मला जगायचं होता तुझ्यासोबत संपूर्ण आयुष्य राहायचं होतं पण या नराधम राक्षसापुढे माझा काही एक चाललं नाही....; इतका बोलून ती रडू लागली...;
आणि दिपकला... बोलली..;
खरच रे दिपक मी खूप प्रेम करते रे तुझ्यावर ....; पण या जन्मी मी तुझी होऊ शकले नाही याचाच खूप दुःख आहे मला....; कदाचित या कारणामुळेच माझ्या आत्म्याला शांती मिळाली नाही ....;
पण आज मी याला जिवंत सोडणार नाही .....;जसे याने मला मारला तसच मी त्याला आता मारणार आहे .... ;
मृणाल चे बोलणे ऐकुन विशाल रडू लागला आणि तिचे पाय पकडून माफी मागू लागला....; प्लीज मला माफ कर मृणाल माझ्याकडून खूप मोठी चूक झाली ....;
मला माफ कर .... !
मी तुला दिपक पासून दूर करून खूप मोठी चूक केली....! प्लीज मला माफ कर आज ....!
म्हणून आपल्या प्राणाची भिक मागू लागला....;
मी पण असाच तुझ्याकडे विनवणी केली होती ,मला सोडलास का तू...?
मी का तुला आज सोडू सांग......!
म्हणून तिने त्याच्या चेहऱ्यावर एका लोखंडी गजाने वार केली....
तेव्हा दिपक अचानक मृणालला रोखत बोलला ....;
थांब मृणाल...., त्याला आता मारून तुला काही भेटणार नाही ....; त्याने जे तुझ्यासोबत केला तेच तू आता त्याच्या सोबत करणार...; म्हणजे त्याच्यामध्ये आणि तुझ्यामध्ये काय फरक राहिला ....., त्याला त्याच्या कर्माची शिक्षा नक्की भेटेल... तु हे पाप तुझ्या हाती नको लाऊन घेऊ...!
दिपक चे बोलणे ऐकून मृणाल शांत झाली ,आणि हातातील लोखंडी गज खाली सोडून रडू लागली ....;
काय चुकलं होतं माझे....;मी कोणाचं वाईट केला होतं का..? मग का मला तुला सोडून जावं लागलं .... ? किती स्वप्न पहिली होती मी ....., सगळं एका क्षणात संपवून टाकलीत याने ....;.
दिपक मला माफ कर माझी चूक नसताना मला तुला सोडून जावं लागलं ....;
मला हा जन्म तुझ्यासोबत घालवायचा होता पण ते आता शक्य नाही...;आणि देवालाही ते मान्य नाही...., पण मी परत येईन तुझ्यासाठी.... प्लीज मला शेवटचं तुझ्या मिठीत घे ....;
दिपकने तिला मिठीत घेतलं..; आणि बोलला मी फक्त तुझाच आहे ग पिल्लू....मी तुझी वाट पाहीन लवकर ये परत....;आणि तिला घट्ट पकडून रडू लागलं.....,
हो मी नक्की येईन रे फक्त तुझ्यासाठी....बोलून मृणाल शांत झाली....,
दिपक ची मिठ्ठी थोडी सैल झाली आणि मृणाल त्याच्या मिठीतुन हळू हळू धुरासारखी गायब होऊ लागली.....,
हे सगळे दृष पाहून सगळ्यांचे डोळे अश्रूंनी भरून आले आणि सगळ्यांच्या डोळ्यातून अश्रूंचे पाठ वाहू लागले....,
दिपक गायब होत चालल्या मृणाल कडे पाहतच राहिला आणि जमिनीवर बसून रडू लागला....;
काही वेळ तसाच बसून राहिला...., नंतर एक स्मित हास्य घेऊन उठला आणि ....सगळ्यांना बोलला चला निघायला हवा आपल्याला...., खूप उशीर झाला आहे....,त्याला वाईट ही वाटतं होतं पण त्याला खात्री होती त्याची मृणाल त्याच्यासाठी परत येईल....;कारण त्याला माहित होतं....,त्याची पिल्लू त्याला कधी खोटं बोलणार नाही ....मनात तेवढीच अशा ठेवून तो चेहऱ्यावर एक समाधान ठेवून परत निघून आला.


Comments
Post a Comment